challange
challange
challange

वेगवेगळे एकाधिक इन्जेक्शन देणे म्हणजे पुन्हा पुन्हा बाळाचे रडणे आणि असुविधा असल्याकारणाने, आजकालच्या माता संयोजीत लसीकरणाला स्विकारू शकतात आणि त्यात समाविष्ट असलेल्या ‘वेदने’ ला कमी करू शकतात. आणखी काय, संयोजीत लसीकरण हे असंख्य पर्यायामध्ये उपलब्ध आहे, जे खाली नमूद केलेल्या 3 ते 6 आजारांना फक्त 1 इन्जेक्शन मध्ये व्यापते.

संयोजीत लसीकरणाबद्दल
प्रत्येक मातेला आवश्यकपणे
काय माहित असावे?

संयोजीत लसीकरण म्हणजे काय?
संयोजीत लसीकरणाचे फायदे कोणते आहेत?
माझ्या बाळाला संयोजीत लसीकरण केव्हा द्यावे?
खाली नमूद करण्यात आलेल्या 6 आजारांसाठी उपलब्ध असलेल्या संयोजीत लसीकरणाचे कोणते वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत?
स्वतंत्र लसीकरण देण्याच्या तूलनेत संयोजीत लसीकरण देण्याचे काही अतिरिक्त दुष्परिणाम आहेत काय?

घटसर्प

घटसर्प म्हणजे काय आणि तो माझ्या बाळाला कसा होऊ शकतो?
घटसर्प हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो सामान्यपणे नाक आणि घसा यांच्या श्लेष्मल पटलाला प्रभावित करतो.घटसर्प बहुदा खालीलद्वारे पसरतो:

संसर्गित व्यक्ती खोकल्याने किंवा शिंकण्यामधून उडणाऱ्या श्वसनाच्या फवाऱ्याने.

दूषित व्यक्तीगत किंवा घरगुती वस्तू - एखाद्या बाळाला वस्तू जसे की खेळणे, ज्यावर घटसर्प होऊ शकेल असे विषाणू आहेत, खेळायला दिल्यास त्याद्वारेदेखील घटसर्प होऊ शकतो.

माझ्या बाळाला घटसर्प झाल्यास काय होईल?
घटसर्पाच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा, घसा दुखणे, ताप आणि मानेमधील सुजलेल्या ग्रंथी यांचा समावेश असतो. घसामध्ये एक जाड आच्छादन तयार होते ज्यामूळे पूढे श्वासोच्छश्वास करण्यास किंवा गिळण्यास अडचण येऊ शकते. ते श्वासाच्या मार्गाला अडथळा करून, हृदयाची हानी, मज्जासंस्थेची हानी, फुफ्फुसाचा संसर्ग आणि पक्षाघात यासारख्या जटीलताकडे घेऊन जाऊ शकतो.

मी माझ्या बाळाला घटसर्पापासून कसे संरक्षित करू शकेन?

घटसर्प लसीने प्रतिबंधीत करता येतो. घटसर्पाची लस ही सामान्यपणे धर्नुवात आणि डांग्या खोकला (पर्ट्यूसिस) साठीच्या लसीसह संयोजीत केलेली असते. अन्य एन्टीजेनसह घटसर्पाची लस एकत्रीत देणे हे लहानपणी देण्यात येणा-या लसीकरणापैकी एक आहे जे अर्भकाला डॉक्टरांद्वारे शिफारशीत केले जाते.

सर्व स्वच्छतेची काळजी घेऊन आजारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीपासून बाळाला दूर ठेवण्याची खात्री करणे आवश्यक आहे.

परत जा

डांग्या खोकला

डांग्या खोकला म्हणजे काय आणि तो माझ्या बाळाला कसा होऊ शकतो?

पर्ट्यूसिस (डांग्या खोकला म्हणून ज्ञात) हा अतिशय घातक सांसर्गिक श्वसनाचा संसर्ग आहे जो अतिशय गंभीर असू शकतो, खास करून नवजात बालकांसाठी आणि अर्भकांसाठी.

डांग्या खोकला हा हवेच्या माध्यमातून सांसर्गीक थेंबांद्वारे पसरतो, त्यामुळे तो सहजपणे आजार असलेल्या व्यक्तीच्या जवळ गेल्याने किंवा अन्य लोकांद्वारे खोकल्याने किंवा शिंकण्याने प्रसारीत होतो. नवजातांसाठी माता या डांग्या खोकल्याच्या संसर्गाचे मुख्य स्त्रोत आहेत.

माझ्या बाळाला डांग्या खोकला झाल्यास काय होईल?

डांग्या खोकला बाळे आणि 2 महिन्यापेक्षा कमी वयाची अर्भके यांच्यामध्ये गंभीर आणि काही वेळा जीवघेण्या जटीलतेला कारणीभूत होऊ शकतात. अर्भक आणि लहान मुले यांच्यासाठी कष्टप्रद असू शकतो आणि श्वसनामधील अडथळ्याने ती निळी पडू शकतात.

माझ्या नवजाताला डांग्या खोकल्यापासून वाचवण्याचे मार्ग कोणते आहेत?

अर्भकांना लसीकरण करून डांग्या खोकला प्रतिबंधित केला जाऊ शकतो. तरूण अर्भकामध्ये डांग्या खोकल्याला रोखण्याच्या अन्य योजनेमध्ये मातांचे, कौटुंबिक सदस्याचे आणि जवळील संपर्कांचे लसीकरण याचा समावेश आहे. अधिक तपशीलासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

परत जा

धर्नुवात

धर्नुवात म्हणजे काय आणि तो माझ्या बाळाला कसा होऊ शकतो?

धर्नुवात हा तीव्र असतो, जो बॅक्टेरियम क्लोस्ट्रीडियम टिटानी द्वारे कारणीभूत होणारा जीवघेणा आजार आहे.

त्याची वैशिष्टे ही सर्वसाधारण ताठरपणा आणि अस्थिकंकालाच्या स्नायूंचे संकोचणे ही आहेत. सामान्यपणे जबडा (लॉकजॉ) आणि मान यांचे स्नायू ताठर होतात आणि नंतर ते संपूर्ण शरीरामध्ये पसरू शकतात.

बॅक्टेरियाचे बीजाणू हे सामान्यपणे जमीन, धूळ, आणि खतामध्ये आढळून येतात आणि - सामान्यपणे दूषित वस्तूच्या द्वारे कापणे किंवा फाटणे, जखम होणे यामुळे त्वचेमधील फटीमधून शरीरामध्ये प्रवेश करतात.

माझ्या बाळाला धर्नुवात झाल्यास काय होईल?

नवजातांच्या धर्नुवातामध्ये, स्नायू संकोचणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे, ज्यानंतर नवजाताला स्तनपान करणे किंवा ओढणे शक्य न होणे आणि मोठ्या प्रमाणात रडणे याचा समावेश होतो.

मोठया बालकांमध्ये आणि प्रौढामध्ये , त्यामुळे जबड्याला पेटके येणे, स्नायूचे वेदनादायकरितीने घट्ट होणे आणि झटके येणे होऊ शकते. यामुळे हाडे तुटणे, श्वासोच्छश्वास करण्यास अडचण, स्वरतंतू संकोचणे याकडे घेऊन जाऊ शकते.

माझ्या नवजाताला धर्नुवातापासून वाचवण्याचे मार्ग कोणते आहेत?

धर्नुवाताच्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरणाची आणि जखमेची चांगल्या प्रकारे काळजी घेणे याची सीडीसी शिफारस करते. ज्या ठिकाणी कोणालातरी गंभीररितीने इजा झालेली आहे आणि त्याला धर्नुवाताच्या लसीपासून संरक्षण नाही असा केसेसमध्ये धर्नुवाताला रोखण्यासाठी डॉक्टर औषधांचा देखील वापर करू शकतात.

परत जा

पोलियो

पोलिओ म्हणजे काय आणि तो माझ्या बाळाला कसा होऊ शकतो?

पोलिओ हा विषाणूमूळे होणारा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. तो मज्जारंजू प्रणालीला बाधित करतो, आणि त्यामुळे पक्षाघात, श्वासोच्छश्वास घेण्यास अडचण येऊ शकते आणि काहीवेळा मृत्यु देखील होऊ शकतो. पोलिओ मुख्यत्वे करून 5 वर्षाच्या आतील बालकांना होतो आणि तो अतिशय सांसर्गिक आहे.

तो व्यक्ती-ते-व्यक्ती मध्ये मुख्यत्वे करून मैलाद्वारे मौखिक मार्गे किंवा सामान्य वहनातून (उदा, दूषित पाणी किंवा अन्न) यामधून पसरतो. जर तुमचे बाळ दूषित झालेली खेळणी त्याच्या तोंडात ठेवल्याने देखील, ते संसर्गित होऊ शकते.

माझ्या बाळाला पोलिओ झाल्यास काय होईल?

सीडीसीनुसार, पोलिओ विषाणूचा संसर्ग झालेल्या 4 लोकांपैकी 1 एकाला फ्ल्यू सारखी लक्षणे असतील ज्यामध्ये घसा दुखणे, ताप, थकवा, मळमळणे, डोकेदुखी आणि पोटात दुखणे याचा समावेश आहे. मेंदू आणि पाठीचा कणा यांचा समावेश असलेली लक्षणे रुग्णांच्या काही भागात विकसित होऊ शकतात. पक्षाघात हे पोलिओसह असलेले सर्वात गंभीर लक्षण आहे. ते कायमस्वरूपी अपंगत्व आणि मृत्युला कारणीभूत होऊ शकते.

माझ्या नवजाताला पोलिओपासून वाचवण्याचे मार्ग कोणते आहेत?

पोलिओला रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग हा लसीकरण आहे. पोलिओ विरोधातील लसीकरणाच्यावरील अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांबरोबर बोला.

परत जा

हिमोफिलस इन्फ्लुएंझा
प्रकार बी

हिमोफिलस इन्फ्लुएंझा प्रकार बी काय आहे आणि तो माझ्या बाळाला कसा होऊ शकतो?

हिमोफिलस इन्फ्लुएंझा हा आजार एच.इन्फ्लुएंझा नावाच्या जिवाणूपासून होतो.

याचे नाव जरी एच. इन्फ्लुएंझा असले तरी देखील यामुळे इन्फ्ल्युएंझा (फ्ल्यू) होत नाही. हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाईप बी (एचआयबी) हा एक जीवाणू आहे ज्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग ज्यामध्ये सौम्य कानाचा संसर्ग ते गंभीर न्यूमोनिया, मस्तिष्कदाह आणि अन्य आक्रमक आजार हे खास करून 5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये होतात.

लोक एच. इन्फ्लुएंझा पसरवू शकतात, ज्यामध्ये एचआयबी ने, इतरांसोबत जवळचा संपर्क आल्यानंतर खोकल्याने किंवा शिंकण्याद्वारे पसरवू शकतात. कदाचीत जे लोक आजारी वाटत नाहीत त्याच्या नाकामध्ये आणि घशामध्ये देखील जीवाणू असू शकतो आणि ते जीवाणू पसरवू शकतात.

माझ्या बाळाला एचआयबी झाल्यास काय होईल?

एचआयबी मुळे होणाऱ्या सामान्य आक्रमक आजारामध्ये न्यूमोनिया, रक्तप्रवाहाचा संसर्ग आणि मस्तिष्कदाह यांचा, समावेश असतो. मस्तिष्कदाह हा मेंदू आणि पाठीचा कणा यांना होणारा संसर्ग आहे. तो सुरूवातीला उच्च ताप, डोकेदुखी, कमी प्रमाणात खाणे आणि पिणे यांच्यासह असू शकतो.

सीडीसी नुसार, एचआयबी या आक्रमक आजाराने ग्रस्त असलेल्या बऱ्याच मुलांना रुग्णालयामध्ये सुश्रुषा देण्याची गरज आहे. अगदी उपचारानंतर देखील, जास्तीत जास्त 20 मुलांपैकी 1 मूल एचआयबी मस्तिष्कदाहाने मृत्यु पडतात. जास्तीत जास्त 5 पैकी 1 मुले जी एचआयबी मस्तिष्कदाहातून वाचतात त्यांच्या मेंदूची हानी होते किंवा बहिरी बनतात.

माझ्या नवजाताला पोलीओपासून वाचवण्याचे मार्ग कोणते आहेत?

डब्ल्यूएचओ ने गंभीर एचआयबी आजाराला रोखू शकण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये लसीकरण करण्याची शिफारस केलेली आहे. एचआयबी लस ह्या अगदी लहानपणी दिल्यातरी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे गृहित धरतात.

परत जा

हेपेटाइटिस बी

हेपेटाइटिस बी म्हणजे काय आणि तो माझ्या बाळाला कसा होऊ शकतो?

हेपेटाइटिस बी हा यकृताचा संसर्ग असून तो रक्त आणि शरीरातील द्राव्ये यामधून पसरतो. हेपेटाइटिस बी हा मुलांमध्ये थोडया कालावधीचा सौम्य आजार ते गंभीर आयुष्यभर राहणारा आजार या श्रेणीत असतो. तो वर्षानुवर्षे कायम राहू शकतो आणि गंभीररीतीने यकृताच्या हानीला कारणीभूत होऊ शकतो.

बाधित माता तिच्या बाळाला जन्माच्या वेळी संसर्गाला पसरवू शकते.हेपेटाइटिस बी विषाणू हा रक्त, वीर्य, आणि अन्य शरीर द्राव्य हे हेपेटाइटिस बी विषाणूने बाधित असते तेव्हा ते बाधित नसलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि पसरते.

माझ्या बाळाला हेपेटाइटिस बी झाल्यास काय होईल?

सीडीसी नुसार, 5 वर्षाच्या आणि मोठे असलेल्या 30%-50% लोकांना तीव्र हेपेटाइटिस बी ची लक्षणे असू शकतात. 5 वर्षाच्या आतील बरीचशी मुले आणि लोक ज्यांना गंभीर आरोग्य समस्या आहेत जसे प्रतिकारक्षमता दमन झालेली मूले, त्यांच्यामध्ये सामान्यतः लक्षणे नसतात.

हेपेटाइटिस बीच्या लक्षणांमध्ये, थकवा, ताप, भूक जाणे, मळमळणे, त्वचा किंवा डोळे पिवळे होणे, पोटात दुखणे आणि गडद लघवी होणे यांचा समावेश असतो.

बाधित अर्भकापैकी सुमारे 90% (उदा. 1 वर्षे वयाच्या आतील मुले) मध्ये दीर्घकालीन संसर्ग विकसित होतो. मुले जशी मोठी होतात तसा धोका कमी होत जातो. वयाच्या 1 आणि 5 वर्षाच्या आतील सुमारे 25%-50% बाधित मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणारा हेपेटाइटिस बी विकसित होईल.

दीर्घकाळ असणाऱ्या हेपेटाइटिस बी मुळे यकृताला हानी पोहचणे, सिर्‍हॉसिस, यकृत कर्करोग आणि अगदी मृत्यु देखील होऊ शकतो.

माझ्या नवजाताला हेपेटाइटिस बी पासून वाचवण्याचे मार्ग कोणते आहेत?

सीडीसी नुसार, हेपेटाइटिस बी ला प्रतिबंधित करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा लसीकरण आहे. संपूर्ण संरक्षणासाठी इंजेक्शन टोचण्याची मालिका पूर्ण करण्याची गरज आहे. 21 हेपेटाइटिस बी विरोधातील लसीकरणाबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांसोबत बोला.

परत जा
या आजारांना कसे रोखावे तसेच लसीकरणावरील अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बालरोगचज्ञांशी सल्लामसलत करा.