challange
challange
challange

बालरोगतज्ञांना विश्वास वाटतो की लसीकरणाला विलंब केला जाऊ नये कारण त्यामुळे बालकांमध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो.
संभाव्यपणे गंभीर आजारांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.

लसीकरण चुकवू नका.

ज्यामुळे आजार कुलूपबंद होतात. बालपण नाही.

वयाच्या 18 वर्षापर्यंत शिफारसित* असलेल्या लसींची सूची पाहण्यासाठी खालील शिर्षकावर क्लिक करा.

डाउनलोड करें

कोविड-19 च्या साथीच्या रोगाच्या दरम्यान आपल्या बालकाच्या चुकलेल्या लसीकरणाने तुम्ही चिंतित आहात काय?

तुमच्या शंकांची उत्तरे खाली मिळवा

1.माझ्या बाळाची लस चुकली आहे का याची मला खात्री नाही, मी काय करावे?अधिक वाचा
 • मुलांचे वेळेवर लसीकरण करणे त्यांना गंभीर आणि संभाव्यतः जीवघेण्या आजारापासून संरक्षित करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. आजार नियंत्रण आणि प्रतिबंधनसाठीचे केंद्र (सीडीसी) शिफारसित करते की मुलांना शिफारशित करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण करण्यात यावे.
 • जेव्हा मुलांना लसीकरण दिले जात नाही किंवा लसीकरणाला विलंब होतो, तेव्हा ज्या आजारांना सहजपणे लसीकरणातून रोखले जाऊ शकते त्या गंभीर आजारांच्या विरोधात मूलांना असंरक्षित सोडले जाते.
 • तुमच्या बाळाचे लसीकरण कार्ड आजच तपासा, ज्यामध्ये तुमच्या बाळासाठी वयाच्या नुसार शिफारशित करण्यात आलेल्या लसी आहेत. तुमच्या बालरोगतज्ञांशी चुकलेल्या किंवा देय असलेल्या लसीकरणावर अधिक माहितीसाठी चर्चा करा.
2.कोविड-19 च्या महामारीच्या दरम्यान चुकलेले/असलेल्या लसीकरणासाठी उपलब्ध मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत?अधिक वाचा
 • जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (डब्ल्यूएचओ) वैश्विक मार्गदर्शके: लसीकरण ही अत्यावश्यक आरोग्य सेवा आहे. अगदी थोड्या कालावधीसाठी देखील, लसीकरण सेवांमध्ये व्यत्यय आल्याने, संवेदनशील व्यक्तींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते आणि लसीकरणाने प्रतिबंध करता येऊ शकणाऱ्या (व्हिपीडी)उद्रेकक्षम आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
 • इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडिऑट्रिक्स (आयएपी) द्वारे: भारतीय मार्गदर्शक तत्वे प्रतिबंधन (लसीकरणाच्या समावेशासह) आणि संक्रमणशील आजाराचे व्यवस्थापन ही “अत्यावश्यक वैद्यकीय सेवा” म्हणून गणली आहे. “लसीकरण हा आरोग्यसेवाचा गाभा आहे” ज्याला संक्रमणशील आजाराच्या प्रतिबंधासाठी आणि जिथे शक्य आहे तिथे, कोविड-19 साथीच्या रोगाच्या दरम्यान पुढे सुरू ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यासाठी प्राधान्यक्रम दिला पाहिजे. कोविड-19 साथीच्या रोगाच्या दरम्यान निरोगी बालकाला लसिकरण करण्याने कोणताही धोका असल्याचे दस्तऐवज नाही.
3.या वेळेला लसीकरण करण्याच्या दरम्यान कोणती सावधगिरी /काळजी घ्यावी? अधिक वाचा
 • फक्त लसीकरणाच्या भेटीची वेळ आधी ठरवून तुमच्या बालरोगतज्ञाला भेट द्या.
 • वारंवार अंतराने अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापरा.
 • लहान बाळाला सोडून, सर्व काळजी घेणारे आणि मुले यांनी मास्क परिधान करावा.
 • सर्व काळ समाजीक अंतराचे पालन करा आणि शक्य तेवढा जास्त पृष्ठभागाचा स्पर्श टाळा.
 • कोणतीही खेळणी/व्यक्तिगत वस्तू बाळगू नका आणि दरवाज्यांच्या हॅण्डलला स्पर्श करणे टाळा.
 • डिजीटल पेमेंटला प्राधान्य द्यावे.
 • लसीकरणास सोबत म्हणून ज्येष्ठ नागरीकांनी (60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले) जाण्याचे टाळावे.
 • लसीकरणाच्या चिकित्सालयात कर्मचारीवृंदाच्या सल्ल्यानुसार प्रवेश करा, बाहेर पडा आणि स्वतःची वर्तणूक ठेवा.
4.लसीकरणासाठी मी माझ्या बालकाला बाहेर नेण्याबद्दल चिंतिंत आहे, कारण त्यामुळे कोविड-19 च्या धोक्यामध्ये वाढ होऊ शकते? अधिक वाचा
 • जीवनावश्यक वस्तू (दूध, औषधे इ.) आणि सेवा (बँकिंग, आरोग्य सेवा इ.) मिळवण्यासाठी बाहेर पडण्याने देखील कोविड-19 ने बाधित होण्याच्या धोका असतो. परंतु आपण आवश्यक त्या सावधगिरीचे पालन करून धोक्याला कमी करण्याचा प्रयत्न करतो
 • त्याचप्रमाणे, लसीकरण ही एक अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आहे आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगळ्यास तुम्हाला आणि तुमच्या बालकाला संसर्ग होण्याच्या धोका कमी होऊ शकतो.
 • उलटपक्षी, जेव्हा मुलांना लसीकरण दिले जात नाही किंवा लसीकरणाला विलंब केल्यास, ते लसीकरणाने प्रतिबंधित केल्या जाऊ शकणाऱ्या संभाव्यता गंभीर आजारांच्या विरोधात असंरक्षित सोडले जातात
 • तुमच्या बालरोगतज्ञाद्वारे सल्ला दिलेले लसीकरणाचे वेळापत्रकाचे अनुसरण करणे हा शहाणपणाचा निर्णय आहे
5.माझ्या बाळाचे देय असलेले लसीकरणासाठी परवानगी असलेला विलंब किती आहे?अधिक वाचा

तुम्हाला तुमच्या बाळाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाबद्दल मार्गदर्शन करण्यास तुमचे बालरोगतज्ञ हे सर्वोत्तम सहाय्यक आहे. तुमच्या बाळाच्या लसीकरणाचे कार्ड आजच तपासा आणि अधिक माहितीसाठी तुमच्या बालरोगतज्ञांशी सल्लामसलत करा.

लसीकरण केल्याने 20 पेक्षा अधिक जीवघेण्या आजारांना रोखले जाऊ शकते.

लसीकरणाने अनेक देशांमध्ये लसीकरणाद्वारे प्रतिबंधित होणारे आजार कमी करण्यास आम्ही सक्षम होतो. तथापि, जर लोकांना त्याच्यांशी संबंधित असलेल्या लसी मिळण्यापासून थांबवल्यास, लसींनी प्रतिबंधित करता येऊ शकणारे आजार पुन्हा दिसू लागल्याचे आपणाला दिसेल.

लसींनी मदत केलेली आहे:

 • देवीरोगाचे निर्मुलन करण्यास
 • पोलिओचे जवळपास संपूर्ण निर्मुलन झालेले आहे
 • जगभरात 2000 आणि 2018 च्या दरम्यान गोवरशी संबंधित मृत्यु 73% नी कमी झाले आहेत.
 • 2000-2018 च्या दरम्यान रुबेलाच्या केसेस 97% नी कमी झाल्या आहेत

लसी समाजाला देखील मदत करतात:

 • व्यक्ती: ज्या आजारांचा मुलांच्या मृत्युला सर्वसामान्य कारण असण्याचा इतिहास आहे अशा लसीने प्रतिबंधित करता येणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करून लसीकरणाने आरोग्य आणि क्षेम कुशलामध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते.
 • समाज - समाजामध्ये लसीने प्रतिबंधित होणा-या आजारावरील लसीकरणाने आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • अर्थकारण - अभ्यासाने असे दर्शविले आहे की लसीकरण आर्थिक विकासाच्या वाढीला, उत्पादकतेला आणि कार्यबलाच्या सहभागाला फायदेशीर झालेले आहे.
*जागतिक स्तरावर गोवराने होणारे मृत्यु 73% कमी झालेले आहेत ज्यांचा 2000 मध्ये अंदाज 536000 पासून 2018 मध्ये 142,000 पर्यंत खाली आलेला आहे.
**2000 मध्ये 102 देशांमध्ये नोंदवण्यात आलेल्या रूबेलाच्या 670894 केसेचे प्रमाण 97% कमी होऊन ते 2018 मध्ये 151 देशांमध्ये 14621 एवढे झाले आहे.


आजच आपल्या बालरोगतज्ञाशी चुकलेल्या किंवा लांबलेल्या लसीकरणासाठी चर्चा करा !


Share On
शीर्षावर जा

* Adapted from Advisory committee of vaccination & immunization practices, 2018-19 recommendations by Indian Academy of Pediatrics
Disclaimer: Information appearing in this material is for general awareness only and does not constitute medical advice.
The above vaccination list is not comprehensive and you may be advised additional vaccination based on your medical condition.
Please consult your Pediatrician for more information, question or concern you may have regarding your condition.
Issued in public interest by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited. Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India.